पाकिस्तानच्या समर्थनार्थ एका मेडिकलच्या विद्यार्थिनीने पोस्ट केल्याची घटना विजापूर येथे घडली आहे. (File Photo)
बेळगाव

India Pakistan Conflict | पाक समर्थनार्थ पोस्ट करणं कर्नाटकातील विद्यार्थिनीच्या अंगलट, विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Karnataka Medical Student Viral Post | कर्नाटकातील मेडिकलच्या विद्यार्थिनीने देशविरोधी पोस्ट केल्याचे समोर येताच वातावरण तापले. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने यु टर्न घेत माफी मागितली.

पुढारी वृत्तसेवा
काशिनाथ सुळकुडे

Vijayapura Medical Student Pro Pakistan Post Apology

चिकोडी : संपूर्ण देशभरात भारतीय सैनिकांचा जयजयकार करून नैतिक पाठिंबा दिला जात असताना पहलगाम येथे निष्पाप नागरिकांचा जीव घेतलेल्या पाकिस्तानच्या समर्थनार्थ एका विद्यार्थिनीने पोस्ट केल्याची घटना विजापूर येथे घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच विद्यार्थिनीने यु टर्न घेत अशी चूक मी पुन्हा करणार नाही. सर्वांची माफी मागतो. 'जय हिंद' अशी पोस्ट पुन्हा केली आहे.

कर्नाटकातील या मुलीने शत्रू राष्ट्राच्या समर्थनार्थ पोस्ट करून देशद्रोही कृत्य केले आहे. विजापूर येथील मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी असलेली तशौदा फारुकी शेख असे पोस्ट केलेल्या तरुणीचे नाव आहे. या विद्यार्थिनीने '@hoodyyyyyyy' नावाच्या या खात्यावरून "माझ्या पाकिस्तानी मित्रांना, आयओजेके , एजेके लोकांनी सरकारी मिलिटरी ठिकाणांकडे जाऊ नका. सीमेपासून 200 किलोमीटर जाऊ नका. अल्ला पाकिस्तान व आम्हा सर्वांना भारतापासून रक्षण करू दे अमीन#sos" अशी देशविरोधी पोस्ट समाज माध्यमांवर केली आहे.

विद्यार्थिनी तशौदा फारुकी शेख हिची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर हिंदू संघटनांनी तिच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय विनोद दोडमनी यांनी स्वयंप्रेरित तक्रार दाखल केली आहे.

देशाची एकता व समग्रतेला धोकादायक व देशाच्या एकतेला धोकादायक असलेली पोस्ट केल्याच्या आरोपाखाली दंत वैद्यकीय विद्यार्थी तशौदा विरुद्ध बीएनएस 152. 197.3 (5) अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान तक्रार दाखल केल्यानंतर विद्यार्थिनीने यु टर्न घेत हे माझ्या इंस्टाग्राम खात्यातून कॉमेंट् करणे मूर्खाचे कृत्य केले आहे. खरोखरच सर्वांची माफी मागतो. पुढे अशा प्रकारची चूक मी करणार नाही, असे मी जाहीर करतो. 'जय हिंद' अशी पोस्ट पुन्हा केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT