बंगळूर : कौटुंबिक राजकारणात कर्नाटक देशात चौथ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील तब्बल 94 नेत्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. या यादीत उत्तर प्रदेश पहिल्या स्थानी असून, महाराष्ट्र दुसर्या आणि बिहार तिसर्या स्थानी आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार देशात कुटुंब राजकारण किती रुजले आहे, हे या अहवालात असे दिसून आले आहे. देशातील 21 टक्के खासदार आणि आमदारांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे.
कौटुंबिक राजकारणात कर्नाटक राज्यात 94 लोक असे आहेत जे वंशपरंपरागत वारसाद्वारे सत्तेवर आले आहेत. उत्तर प्रदेशात 141 लोक आहेत, महाराष्ट्रात 129 लोक आहेत आणि बिहारमध्ये 96 लोक आहेत. आसाम शेवटच्या क्रमांकावर आहे, असे अहवालात म्हटले आहे.
देशभरातील पाचपैकी एक खासदार किंवा आमदार कौटुंबिक राजकारणातून आहेत. अहवालातून असे दिसून येते की दक्षिण भारतातील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात घराणेशाहीची मुळे मजबूत आहेत.