आईस्क्रीमची शाळेत जाहिरात Pudhari Photo
बेळगाव

बेळगाव : आईस्क्रीमची शाळेत जाहिरात, पालकांना मनस्ताप

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील एका नामवंत कंपनीने शुक्रवारी (दि. 20) पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गावर 15 रुपयाचा आईस्क्रीम 10 रुपयात मिळणार असल्याची जाहिरातबाजी केली. शिक्षण खात्याने आपणाला परवानगी दिल्याची खोटी माहिती देत सरकारी व खासगी शाळांमध्ये आईस्क्रीम पासचे वितरण केले. त्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप झाला. जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांना संपर्क साधला असता कोणत्याही कंपनीला आपण परवानगी दिली नसल्याची माहिती दिली.

प्राथमिक शाळेत शिकणारी मुले बदलत्या हवामानामुळे आजारी पडत आहेत. त्यात एका कंपनीने 15 रुपयाचा आईस्क्रिम 10 रुपयात मिळणार असल्याने मुलांनी पालकाजवळ आईस्क्रिम खाण्याचा हट्ट धरला. या कंपनीचा आईस्क्रीम ठराविक दुकानात मिळत असल्याने तो मिळवण्यासाठी पालकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्या संदर्भात पालकांनी शाळेतील मुख्याध्यापकाजवळ तक्रार केली आहे. यावर आपण परवानगी घेऊनच शाळेत आलो आहे, अशी माहिती दिल्यानंतर आपण आईसक्रीमचे पास वितरणास परवानगी दिल्याची माहिती मुख्याध्यापकांनी तक्रार करणार्‍या पालकांना दिली. शुक्रवारी दिवसभर दै. ‘पुढारी’ कार्यालयात पालकांनी फोन करुन शाळांमध्ये चाललेली जाहिरातबाजी थांबवावी, अशी मागणी केली. आता आईस्क्रीम कंपनीवाले असे प्रकार करताहेत भविष्यात फिज्जा, बर्गर कंपन्यांनी असे शाळेत जाहिरातबाजी केली तर आमच्या मुलांचे स्वास्थ्य बिघडणार नाही का? अशा तक्रारी केल्या. यावर ‘पुढारी’ने प्रकाशझोत टाकावा अशी विनंतीही केली.

शाळांतून शैक्षणिक साहित्याची विक्री

यापूर्वी शाळांमधून शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत साहित्याची विक्री करण्यासाठी विक्रेते शाळेत येतात. त्या साहित्याची खरेदीदेखील पालक करतात. कारण या शिक्षण क्षेत्राशी निगडीत असतात. आईस्क्रीम सारख्या कंपन्या स्कीममधून व्यवसाय करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

शुक्रवारी शाळांमधून एका आईस्क्रीम कंपनीची जाहीरातबाजी केल्याची माहिती मिळाली असून आपण अशा कोणत्याही आईस्क्रीम कंपनीला शिक्षण खात्याने परवानगी दिलेली नाही. आपण याची जातीने चौकशी करु.
-लिलावती हिरेमठ, जिल्हा शिक्षणाधिकारी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT