अंकली : कारच्या आडवे आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार उलटून झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले. आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह त्यांच्या दोघा भावांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवार, दि. 25 रोजी सायंकाळी 5.30 वाजता गुलबर्गा-विजापूर-जेवरगी रस्त्यावर घडली. याप्रकरणी जेवरगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
बंगळूर इलेक्ट्रिक सिटी सप्लाय कंपनीचे मुख्य कार्यकारी आयएएस अधिकारी महांतेश बिळगी रामदुर्ग येथून आपल्या नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी कारने जात होते. जेवरगीजवळील बाळगनूर क्रॉस वळ कुत्रा आडवा आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या भीषण अपघातात आयएएस अधिकारी महांतेश बिळगी यांच्यासह त्यांचे बंधू शंकर बिळगी व इराण्णा बिळगी यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या महांतेश बिळगी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.