हालसिद्धनाथ (Pudhari File Photo)
बेळगाव

Halsiddhnath Yatra 2025 | हालसिद्धनाथ यात्रा 8 ऑक्टोबरपासून

कुर्ली-आप्पाचीवाडी यात्रा कमिटीतर्फे यात्रोत्सव कार्यक्रम जाहीर

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी (ता. निपाणी) येथील हालसिध्दनाथ (भोंब) यात्रा 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या यात्रेनिमित्त दि. 8 ते 12 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 8 रोजी सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, रात्री ढोलजागर, 9 रोजी रात्री ढोलजागर, श्रींची पालखी प्रदक्षिणा, 10 रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा, उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक होणार असून दि. 11 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी दिवसभर महानैवेद्य रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्तर रात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे. दि. 12 रोजी सकाळी 7 वा. घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर सायं. 4 वा. श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी भरणार्‍या या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. नाथांचे भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांची भाकणूक होते. यात्रेनिमित्त पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती आप्पाचीवाडी ग्रा. पं. सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष आप्पासाहेब माने व ग्राम पंचायतीतर्फे देण्यात आली. यात्राकाळात पाच दिवस शाळा आवारात हालसिध्दनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविकांनी या यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेसाठी जादा बसेस

यात्रेत येणार्‍या विविध दुकानांसाठी जागा देण्याचे काम दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 ते 5 या वेळेत होणार आहे. यात्राकाळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. तसेच भाविकांच्या सोयीसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी, रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT