निपाणी: पुढारी वृत्तसेवा
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी प्रगतीनगर येथील हॉटेल प्रार्थनानजीक बंगळूर येथून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे वाहन रस्ता वळणासाठी लावलेल्या लोखंडी बॅरिकेट्स तोडून भरावावर चढला. या अपघातात सुदैवाने या अपघातामुळे जिवितहानी टळली.हा अपघात बुधवारी सायंकाळी झाला. अपघातानंतर चालकाने पळ काढला.
बंगळूर येथून कंटेनर घेऊन हा महामार्गावर प्रार्थना हॉटेलनजीक आला. यावेळी सहापदरी रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी महामार्गाला सर्विस रस्त्याकडे वळण दिले आहे. त्यामुळे वळणासाठी दिशादर्शक लोखंडी बॅरिकेट्स लावले आहेत. वेगात आलेल्या मद्यपी कंटेनर चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बॅरिकेट तोडून ट्रक दुभाजकाच्या भरावावर जाऊन थांबला. अपघातानंतर तातडीने घटनास्थळी रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे यांनी भेट देऊन पोलिसांना पाचारण केले. घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका उमादेवी यांनी भेट देऊन फरार चालकाचा शोध चालवला होता. या अपघातामुळे बेळगावहुन कोल्हापूरकडे होणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.दरम्यान अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून दिली.