बेळगाव पुढारी वृत्तसेवा : दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोना महामारीविरोधात प्रतिबंधात्मक लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात येत आले असून 12 आणि 18 वयोगटावरील मुलांच्या लसीकरणाला जिल्ह्यात तब्बल 102 टक्के प्रतिसाद लाभला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी आरोग्य खात्याने तळागाळापर्यंत मोहीम राबवली आहे.
शालेय आणि महाविद्यालयीन मुलांसाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद लाभला असून अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले आहे. जिल्ह्यातील 12 वर्षांवरील 3974349 मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये 4041135 जणांनी पहिला डोस आणि 4008842 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे एकूण 101 टक्के जणांनी ही लस घेतली आहे. जिल्ह्यातील 18 वर्षांवरील 3566000 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे उद्दिष्ट होते. त्यामध्ये 3638925 जणांनी पहिला आणि 3680569 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. 103 टक्के जणांनी ही लस घेतली असून आरोग्य खात्याची मोहीम यशस्वी झाली आहे.
लस नसतानाही मॅसेज गेल्या काही महिन्यांत कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नसतानाही अनेकांना लस घेतल्याचे मॅसेज आले आहेत. त्यामुळे लोकांत गोंधळाचे वातावरण दिसून येते. एकाच मोबाईलवर अनोळखी लोकांच्या लसीकरणाचे संदेश येत आहेत. त्यामुळे याबाबत आरोग्य खात्याकडून तांत्रिक बिघाडामुळे असे झाले असेल, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा