Nipani News
निपाणी: नजीकच्या सिदनाळ येथे दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांने आयफोनच्या हट्टासाठी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. रुतेश विजय नलवडे (वय १६) असे या विद्यार्थांचे नाव आहे. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रुतेश हा अकोळ येथील एका स्कूलमध्ये दहावी इयत्तेत शिकत होता. दरम्यान, त्याने मला आयफोन पाहिजे असल्याचा हट्ट कुटुंबियाकडे धरला होता. यावेळी त्याला कुटुंबियाने अजून तू दहावी शिकत आहेस, पुढे घेऊ असे समजवले होते. मात्र तो आयफोन घेण्यावर ठाम होता.
शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे शाळेतून आल्यानंतर आपल्या मित्रांसमवेत सायंकाळी चार पर्यंत तो क्रिकेट खेळलत होता. सायंकाळी त्याने घरात कोण नसल्याचे पाहून साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याची माहिती घरी परतलेल्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांना मिळतात ग्रामीण पोलिसांना पाचारण करण्यात आले. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक उपनिरीक्षक एम. एस. सुर्यवंशी, हवालदार मंजुनाथ कल्याणी, परमानंद मारूशेट यांनी भेट देऊन पाहणी केली. मयत रुतेश हा मनमिळावू, हळव्या स्वभावाचा व हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होता. त्याने अचानकपणे आयफोनच्या हट्टापायी टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, बहीण, असा परिवार आहे. याबाबत रूतेशचे वडील विजय नलवडे यांनी रितसर फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक निरीक्षक सूर्यवंशी यांनी चालवला आहे.