चिकोडी : जिल्ह्यातील अथणी येथील एका डॉक्टराचे अपहरण करून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सुमारे दोन तास छळ करून त्यांना सोडण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करूनदेखील आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहारामुळे अपहरण करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
आनंद उपाध्याय असे त्या डॉक्टरांचे नाव असून ते अथणी तालुक्यातील महिषवाडगी येथील रहिवासी आहेत. उपाध्याय हे शिक्षण संस्थेचे मालकही आहेत. त्यांचे डोके, पाठीवर व हाताला जखमा झाल्या आहेत. सवदी गावातील पद्मावती इंटरनॅशनल स्कूलच्या आवारातून डॉ. आनंद यांचे अपहरण करण्यात आले.
सायंकाळी पाचपासून रात्री एकपर्यंत अपहरण करून त्यांचा छळ करण्यात आला. मारहाण केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना पुन्हा अपहरण केलेल्या जागी सोडून दिले. गंभीर जखमी झालेल्या डॉ.र आनंद यांना बेळगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत तक्रार दाखल करूनही पोलिस आरोपींना अटक करत नाहीत. पोलिस जाणीवपूर्वक आरोपींना अभय देत असून अथणी सीपीआय व पीएसआय यांना निलंबित करण्याची मागणी डॉ. आनंद उपाध्याय यांनी केली आहे.