बंगळूर : बेकायदेशीरपणे जमीन वाटप केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधातील खटल्याची सुनावणी उच्च न्यायालयात सुरू झाल्यानंतर पुन्हा नेतृत्व बदलाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाठिंबा देण्यासाठी सरसावलेल्या गृहमंत्री परमेश्वर यांच्यासह अनेक नेत्यांनी हायकमांड आणि पक्षाचे सर्व नेते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे काँग्रेसमध्ये वेगाने राजकीय घडामोडी घडत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोणत्याही क्षणी राजीनामा देतील, असा अंदाज भाजप नेते वर्तवत आहेत.
या घडामोडींवर गृहराज्यमंत्री परमेश्वर म्हणाले की, सध्या मुख्यमंत्रिपद रिक्त नाही. त्यामुळे पुढील मुख्यमंत्र्यांबाबत चर्चा करण्याची गरज नाही. हा खटला न्यायालयात सुरू आहे हे खरे आहे. तिथे काय होते ते पाहावे लागेल. पुढच्या मुख्यमंत्र्यांबाबत सध्या चर्चा करण्याची गरज वाटत नाही.
अलीकडेच मंत्री एम. बी. पाटील आणि मी एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी एकत्रित हासनला भेट दिली होती. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे कुटुंबासह अमेरिकेच्या खासगी दौऱ्यावर गेले आहेत. हा सरकार प्रायोजित दौरा नाही. कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी दौऱ्याची माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दुसरीकडे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न चालणार नाही, असे पाटबंधारे मंत्री एन. एस. बोसराजू यांनी करत आहे. सांगितले.
ते म्हणाले, सिद्धरामय्या यांची खुर्ची हलवण्यासाठी भाजप-निजद नेते विविध कसरती करत आहेत. परंतु यापैकी काहीही यशस्वी होणार नाही. काँग्रेसमधील कोणीही आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे उघडपणे जाहीर केलेले नाही. सर्व मंत्री एकमेकांच्या संपर्कात आहेत. सर्व काही व्यवस्थित सुरु आहे. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगल्या प्रकारे काम
मुख्यमंत्री बदल निश्चित विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री बदल होईल असे आम्ही म्हणत नाही, काँग्रेस नेतेच म्हणत आहेत. मुख्यमंत्री बदल होणार हे मुख्यमंत्र्यांना शंभर टक्के माहिती आहे. सिद्धरामय्या बदलणार हे निश्चित. मंत्री एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, मल्लिकार्जुन खर्गे, डी. के. शिवकुमार, जी. परमेश्वर हे काय करत आहेत. ते आम्हाला माहित आहे.