संकेश्वर : बुगटेआलूर (ता. हुक्केरी) येथे चोरट्यांनी एकाच रात्रीत सहा घरे फोडून सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चोरट्यांनी इंदुबाई रावण यांच्या घराचे कुलूप तोडून तिजोरीतील लक्ष्मीहार, अंगठी, कर्णफुले असे 4 तोळे सोन्याचे दागिने, चांदीची दोन ब्रेसलेट, चैन व 3 हजार रुपये लांबविले. दुसर्या घटनेत विजय चौगुले यांच्या घरातील नेकलेस, लक्ष्मीहार असे दोन तोळ्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.
संतोष पाटील यांच्या घरातील चांदीचे जोडवे व 5 हजार रुपये, परशुराम रावण यांच्या घरातील चांदीचा कंबरपट्टा व जोडवी असा एकूण 8 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. शशिकला शिंदे व प्रकाश दिवेकर यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. पण चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
या घटनांची नोंद? ? संकेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे.? ? बेळगावहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करून शोध घेण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक उमेश शेट्टणावर पुढील तपास करत आहेत.