महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासुन सीमेवर नाकाबंदी Pudhari Photo
बेळगाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आजपासुन सीमा भागात नाकाबंदी

पुढारी वृत्तसेवा

निपाणी : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्रात सीमाभागातील आंतरराज्य मार्गावर कर्नाटकातील पोलिस प्रशासनाकडून गुरुवारी (दि.१७) पासुन नाकाबंदी केली जाणार आहे. त्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.यामुळे निपाणीसह चिकोडी विभागातील पोलिस प्रशासनाने सर्व तयारी चालवली आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी (दि.२०) नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. या निवडणूक काळात मद्य, भेटवस्तूंची बेकायदा वाहतूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक पहारा दिला जातो. आंतरराज्य सीमेवर तात्पुरत्या स्वरूपात पोलिस, महसूल, अबकारीसह निवडणूक विभागाने सूचित केल्यानुसार या नाक्यांद्वारे चोरट्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते.

निवडणुकीत रोख रक्कम, मद्य यासह वस्तू, सोने, चांदीचे दागिने, कपडेही वाटप होत असतात. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे धोरण आखले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंधप्रदेश, केरळमधून बेकायदा वाहतूक होऊ नये, म्हणून कर्नाटकाच्या सीमेवर निपाणी-मुरगुड रोड,आप्पाचीवाडी फाटा तसेच महामार्गावर कोगनोळी टोलनाका या तीन ठिकाणी गुरुवारपासून नाकाबंदी करावी असे आदेश निपाणी पोलीस प्रशासनाला आले आहेत. महाराष्ट्रात निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापणार आहे. तसे कर्नाटकच्या सीमेवर पोलिस प्रशासन सज्ज होत आहे. केंद्र व राज्य सरकारने निवडणूक, सण, सभारंभ, उत्सव काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अनेक बदल केले आहेत. यामध्ये गणेशोत्सव व मोहरम सणामध्येही पथसंचलन राबवले. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज पासून प्रत्यक्षात कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदीला सुरुवात होणार आहे.

गत लोकसभा व विधानसभा निवडणूक काळात सीमावर्ती भागातून होणारी मद्यासह रोखड, कपडे, सोने, चांदीची,तस्करी रोखण्यासाठी नाकाबंदी केली होती. आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे सीमावर्ती भागात आता नाकांबदी केली जाणार आहे. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या आदेशानुसार कोगनोळी टोलनाका, आप्पाचीवाडी फाटा,मुरगूड रोड, बेडकिहाळ सर्कल, शिप्पूर फाटा येथे नाकाबंदी होणार आहे.
बी.एस. तळवार, सीपीआय,निपाणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT