Nashik News | हाणामारी'च्या घटनेनंतर पोलिस अॅक्शन मोडवर, पहिन्याला नाकाबंदी

मद्यपी चालक, हुल्लडबाज, ट्रिपल सीट चालकांवर कारवाई
Nashik News
नाशिक : पहिने येथे नाकाबंदी करून वाहन तपासणी करताना पोलिस.pudhari photo
Published on
Updated on

नाशिक : रविवारी सुटीचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवण्याच्या बहाण्याने त्र्यंबकेश्वर, पहिने येथे येणाऱ्यांना पोलिसांच्या नाकाबंदीचा सामना करावा लागला. ग्रामीण पाेलिसांनी चार ठिकाणी नाकाबंदी करीत मद्यपी चालक, हुल्लडबाज, ट्रिपल सीट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली. वाहनांची तपासणी करीत मद्य नेणाऱ्यांवरही पोलिसांनी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात अद्याप पावसाने अपेक्षीत हजेरी लावलेली नाही. तरीदेखील जिल्ह्यातील पर्यटन स्थळे बहरत असून ती पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील पर्यटक इगतपुरी, वाडिवऱ्हे, त्र‌्यंबकेश्वर, गंगापूर आदी ठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद लुटतात. मात्र त्यासोबत काही हुल्लडबाज, मद्यपी, टवाळखोरही या ठिकाणी येत असल्याने पर्यटन सहलींना काही वेळेस गालबोट लागते. गत आठवड्यात पहिने येथे दोन गटात वाद झाल्याने त्यांच्यात हाणामारी झाली. त्यामुळे सहकुटूंब आलेल्या पर्यटकांमध्ये घबराट उडाली होती. या घटना पुन्हा घडू नये यासाठी ग्रामीण पोलिसांनी यावेळी खबरदारी घेतल्याचे दिसले. पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांच्या सुचनांनुसार ग्रामीण पोलिसांनी पर्यटन स्थळांवर नाकाबंदी करीत वाहन तपासणी केली.

शनिवार व रविवारी (दि.२० व २१) पहिने येथे बंदोबस्तासह चार ठिकाणी पाॅईंट लावुन नाकाबंदी करण्यात आली. बंदोबस्तासाठी पोलीस मुख्यालयातील १ अधिकारी ६ अंमलदार, वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याचे २ अधिकारी १० अंमलदार तैनात होते. पोलिसांनी वाहनांची तपासणी करीत मद्यसाठा नेणाऱ्यांवर कारवाई केली. त्यामुळे तपासणी होत असल्याने अनेकांनी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा बेत आखला तर काहींनी चोर मार्गाने इच्छित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला.

९ मद्यपी चालकांवर कारवाई

बंदोबस्तादरम्यान, ग्रामीण पोलिसांनी मद्यसेवन करून वाहन चालवणाऱ्या ९ चालकांवर कारवाई केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ७८ चालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यात ७२ हजार ५०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. यात टवाळखोरांसह ट्रिपल सिट, विनाहेल्मेट-सीटबेल्ट वाहन चालवणाऱ्यांवरही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news