बेळगाव : संपूर्ण जिल्ह्यात प्रथमच, बिम्स डॉक्टरांच्या पथकाने एका मुलीच्या पाठीच्या कण्यातील गाठ यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन काढण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेबाबत बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. इरण्णा पल्लेद यांनी न्यूरोलॉजिस्टच्या पथकाचे अभिनंदन केले.
बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावातील बसवराज माविनकट्टी यांची सोळा वर्षीय मुलगी लक्ष्मीच्या पाठीच्या कण्यातील ट्युमरच्या उपचारासाठी 13 सप्टेंबर रोजी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती झपाट्याने बिघडत होती. काही दिवस निरीक्षण केल्यानंतर बिम्सचेे न्यूरोसर्जन डॉ. बसवराज बिरादार-पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन केले. त्यानुसार बिरादार पाटील आणि डॉ. संजीव राठोड यांनी नर्सिंग स्टाफ आणि भूल देणार्या कर्मचार्यांसह लक्ष्मीच्या पाठीच्या कण्यातील गाठ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून टाकली आणि तिला बरे केले.
बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्टनी पहिल्यांदाच अशा दुर्मिळ आजारावर उपचार करण्यात आला आहे.
16 वर्षांच्या मुलांमध्ये या प्रकारचा स्पायनल कॉर्ड ट्यूमर दुर्मिळ असतो. स्पायनल कॉर्ड ट्यूमर दिसल्याने शरीर जड होते. हातपाय कमकुवत होतात. त्यामुळे, चालणे किंवा एक पाऊलही टाकणे कठीण होते.