Crime news  file photo
बेळगाव

Bhima Riverbank Murder Case : ६ जणांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात! थरारक पाठलागानंतर गोळीबारात जखमी

गोविंदपूरमधील हत्‍याकांडानंतर २३ दिवस होता फरारी, १५ लाखांची सुपारी घेतल्‍याचा पोलिसांचा संशय

पुढारी वृत्तसेवा

Bhima Riverbank Murder Case : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांची निर्घृण हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विजापूर शहराच्या वेशीवर असलेल्या इत्तीनगीहाळजवळ आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने पोलिसांवरच हल्ला केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मुख्य आरोपी जखमी झाल्‍याचे वृत्त एएनआयने दिले आहे.

आरोपीचा पोलिसावर हल्‍ला करुन पळून जाण्‍याचा प्रयत्‍न

भीमा नदीकाठच्या भागात झालेल्या ६ जणांच्या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी महेश तलवार याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गेल्या २३ दिवसांपासून फरार होता. तो एका ठिकाणी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक त्याला अटक करण्यासाठी गेले होते. या कारवाईदरम्यान आरोपी महेशने पोलिसांवर हल्ला करून आणि त्यांच्यावर दगडफेक करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चडचणचे सीपीआय (CPI) परशुराम मांगुली यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये महेशच्या उजव्या पायाला गोळी लागली.चा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर त्याने पोलीस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला देखील केला.

दोन पोलीस कर्मचारी जखमी

जखमी महेशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेत दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत.पोलीस अधीक्षक (SP) लक्ष्मण निंबरगी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

१५ लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा संशय

भीमा नदीकाठच्या भागात २९ मे रोजी गोविंदपूर गावाजवळ हे ६ जणांचे हत्याकांड घडले होते. गावाजवळील शेतात चडचण येथील निराळे कुटुंबातील पाच सदस्य आणि इतर एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्येसाठी महेश आणि त्याच्या टोळीने १५ लाख रुपयांची सुपारी घेतल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस अधीक्षक निंबरगी यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीत अधिक माहिती समोर येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT