बेळगाव ः तालुक्यातील बेन्नाळी येथे पाच लाखांची घरफोडी झाल्याची नोंद काकती पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी विनायक कल्लाप्पा टक्केकर (वय 37, रा. चव्हाट गल्ली, बेन्नाळी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
126 ग्रॅमचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम चांदी चोरीला गेली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्याददार विनायक हे 10 जानेवारी रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते. या काळात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील खोलीतील कपाटात ठेवलेले 126 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 100 ग्रॅमचे चांदीचे दागिने चोरून नेले. सोन्याच्या दागिन्यांमध्ये अंगठ्या, कर्णफुले, रिंगा, गंठण, चपला हार, सोनसाखळीचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी नोंद करून घेतली असून निरीक्षक सुरेश शिंगे तपास करत आहेत.