बेळगाव : गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पश्चिम घाटात होणार्या संतधार पावसामुळे बेळगावचा नायगारा धबधबा म्हणून ओळखला जाणारा गोकाक धबधबा पूर्ण क्षमतेते कोसळत आहे.
खडकामधून फेसाळत्या दुधाप्रमाणे वाहणारे पाणी पर्यंटकांचे लक्ष वेधून घेत आहे. 180 मीटरहून अधिक खोली असणार्या या धबधब्याचे चित्तथरारक दृष्य पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून येणारे पाणी वाढल्यामुळे घटप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे गोकाक धबधब्यातील पाण्याचा प्रवाह दिवसेंदिवस वाढत आहे.