बेळगाव : बेळगाव शहर परिसरातील पर्यटनप्रेमींना प्रतीक्षा असलेले दैनिक ‘पुढारी’ आयोजित ‘टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्झिबिशन’ शुक्रवारपासून (दि. 25) तीन दिवस बेळगावात सुरु होत आहे. ‘गगन टूर्स’ प्रस्तुत आणि ‘अ हेवन हॉलिडेज’ पॉवर्ड हे भव्य प्रदर्शन त्यानंतर कोल्हापूर व सांगलीतही होणार आहे.
बेळगावात प्रथमच होत असलेल्या या पर्यटन एक्स्पोची जोरदार तयारी सुरु आहे. बेळगावसह सीमाभागातील लोकांना एकाच छताखाली पर्यटनविषयक सर्व माहिती आणि संधींचा खजिना उपलब्ध होणार आहे. हे प्रदर्शन म्हणजे आपल्या स्वप्नातील सुट्टीचे नियोजन करण्याची एक सुवर्णसंधी ठरणार आहे.
हिमाचलच्या बर्फाळ डोंगररांगांपासून ते केरळच्या शांत बॅकवॉटर्सपर्यंत आणि युरोपच्या ऐतिहासिक शहरांपासून ते दुबईच्या आधुनिक वैभवापर्यंतचे असंख्य पर्याय येथे उपलब्ध असतील.
कौटुंबिक सहली, हनिमून पॅकेजेस, साहसी पर्यटन टूर्स आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष यात्रा अशा सर्व प्रकारच्या सहलींची माहिती एकाच छताखाली उपलब्ध असणार आहे. आपल्या बजेटनुसार आणि वेळेनुसार सहल ‘कस्टमाईज’ करुन घेण्यासाठी तज्ज्ञांशी थेट बोलण्याची संधी व वेगवेगळ्या पॅकेजबद्दल सखोल माहिती मिळणार आहे.
केवळ प्रदर्शनासाठी असलेल्या खास सवलती आणि ऑफर्सचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे.
प्रदर्शन पर्यटन व्यवसायातील कंपन्यांसाठीही एक हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. हजारो संभाव्य आणि उत्सुक ग्राहकांना थेट भेटून आपल्या टूर पॅकेजेसची वैशिष्ट्ये समजावून सांगण्याची आणि ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याची संधी कंपन्यांना मिळते. थेट संवादामुळे कंपन्यांना वर्षभरासाठी ग्राहक मिळतात. आपल्या खास ऑफर्स थेट ग्राहकांपर्यंत पोचवून जागेवरच बुकिंग मिळवण्यासाठी हे प्रदर्शन एक उत्तम माध्यम आहे.
दैनिक ’पुढारी’चे हे प्रदर्शन ग्राहक आणि व्यावसायिक या दोघांसाठीही एक ’विन-विन’ सिच्युएशन निर्माण करणारे आहे. यंदा बेळगावमध्ये आयोजन होत असल्याने सीमाभागातील पर्यटनप्रेमींना देश-विदेशातील टूर्स पॅकेजेसची माहिती घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे, बेळगावकरांची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
बेळगाव : दिनांक 25, 26, 27 जुलै. वेळ : सकाळी 10 ते रात्री 8. स्थळ : मराठा मंदिर सांस्कृतिक भवन, खानापूर मेन रोड, रेल्वे उड्डाणपुलाजवळ, टिळकवाडी, बेळगाव.
कोल्हापूर : दिनांक 2, 3, 4 ऑगस्ट. वेळ : सकाळी 10 ते रात्री 8. स्थळ : डॉ. व्ही. टी. पाटील स्मृती भवन, राजारामपुरी, कोल्हापूर.
सांगली : दिनांक 8, 9, 10 ऑगस्ट. वेळ : सकाळी 10 ते रात्री 8. स्थळ : कच्छी जैन भवन, सांगली-मिरज रोड, सांगली.
प्रदर्शनातील तज्ज्ञ व प्रतिनिधी ग्राहकांना त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देतात. त्यामुळे, ग्राहकांना प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यास मदत होते. अनेकदा नवीन पर्यटन स्थळे, ऑफबीट लोकेशन्स आणि सध्याचे ट्रॅव्हल ट्रेंड्स सादर केले जातात. ‘पुढारी’ने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा लाभ ग्राहकांना नक्कीच होईल.अशोक नाईक, माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ साउथ
टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रदर्शनाचा ग्राहकांना अनेक प्रकारे लाभ होतो. ग्राहकांना एकाचवेळी अनेक पर्यटनस्थळे, पॅकेजेस आणि सेवा पाहता येतात. त्यांची तुलना करता येते. प्रदर्शनावेळी कंपन्या विशेष सवलती आणि आकर्षक ऑफर देतात. त्यामुळे, ‘पुढारी’च्या माध्यमातून ग्राहकांना ही एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.बाळासाहेब काकतकर, बीओएम चेअरमन, मराठा बँक