बेळगाव : शहरातील चार परीक्षा केंद्रांवर रविवारी पीजी-सीईटी होणार आहे. यासाठी चारीही केंद्रांबाहेर जमावबंदी राहील, असा आदेश पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला आहे.
एमसीए, एमबीए प्रवेशासाठी 22 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 व दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30 या काळात शहरातील चार केंद्रांवर सीईटी होणार आहे. ही परीक्षा ज्योती पदवीपूर्व कॉलेज, भरतेश पदवीपूर्व कॉलेज, गोमटेश पदवीपूर्व कॉलेज व गोगटे कॉलेज येथे होणार आहे. ही चारीही केंद्र कॅम्प, मार्केट, टिळकवाडी व पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. परीक्षा काळात या सर्व केंद्रांवर जमावबंदी राहणार आहे.
या काळात केंद्रांपासून 200 मीटरपर्यंत जमावबंदी राहणार असून येथे पाचहून अधिक जणांनी फिरू नये, असे आवाहन आयुक्तांनी पत्रकाद्वारे केले आहे.