Belgaum : पुढारी युवा, हेल्थ आयकॉनचे आज वितरण

काकतीतील हॉटेल मेरियॉटमध्ये रंगणार सोहळा
Pudhari Yuva Icon
पुढारी युवा, हेल्थ आयकॉनचे आज वितरण
Published on
Updated on

बेळगाव : समाजोपयोगी उपक्रमांत सातत्याने अग्रेसर असलेल्या ‘पुढारी’ माध्यम समूहातर्फे विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या नेतृत्वांचा गौरव करण्यासाठी ‘पुढारी हेल्थ आणि युवा आयकॉन 2025’ हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. आपल्या कार्यकुशलतेने, सामाजिक भान जपत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणार्‍या डॉक्टर व तरुणांचा या मंचावर सन्मान करण्यात येणार आहे.

यंदाच्या ‘पुढारी हेल्थ आयकॉन’ आणि ‘पुढारी युवा आयकॉन’ सन्मानासाठी निवड झालेल्या मान्यवरांना मंगळवारी (दि. 10) काकतीतील हॉटेल फेअरफील्ड मेरियॉट येथील सभागृहात गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्याहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे युवा कार्याचा गौरव करून, समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी दै. ‘पुढारी’च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात डॉक्टर्स, उद्योजक, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, कृषी, क्रीडा क्षेत्रात काम करणार्‍या तरुणांना सन्मानित करण्यात येणार आहे.

‘पुढारी’चे विविध आयकॉन पुढीलप्रमाणे

पुढारी हेल्थ आयकॉन : डॉ. एम. डी. दीक्षित, डॉ. अंजलीताई निंबाळकर, डॉ. समीर व डॉ. सोनाली सरनोबत, डॉ. सचिन माहुली, डॉ. देवगौडा इमागौडण्णावर, डॉ. स्वप्निल पट्टणशेट्टी, डॉ. मोहन कालेकर, डॉ. राजेंद्र व डॉ. जयलक्ष्मी सलगरे, डॉ. श्रीधर व डॉ. राहिणी कुलकर्णी, डॉ. एन. ए. मगदूम व डॉ. ललिता मगदूम, डॉ. संजीव व डॉ. संध्या पाटील.

पुढारी युवा आयकॉन : मयुरा शिवलकर, संजय तलाठी, एस. एल. तारीहाळकर, मथुरा व बाळकृष्ण तेरसे, रवींद्र चौगुले, डी. बी. पाटील,? ? सदानंद पाटील, डॉ. शिवाजीराव डोळे, बाळू देसूरकर, जयदीप बिर्जे, राजेंद्र वड्डर, डॉ. नवनाथ तेली, डॉ. प्रमोद निळेकर, शिवाजी चलवेटकर, वाय. एम. पाटील, अ‍ॅड. सागर खन्नूकर, निकू पाटील, गणपती पवार, प्रसाद पाटील, अमरजीत पाटील, गोविंद टक्केकर, लक्ष्मीकांत पाटील, सी. के. पाटील, उमेश ऊर्फ प्रवीण देसाई, सचिन खोत, बाळासाहेब हादीकर, अमर सुतार, सिध्दार्थराजे सावंत, सचिन गोरले, सचिन पोवार, सईद व वाहिद पटवेगार, धोंडिराम (पिंटू) बोधले, रामलिंग पाटील, अ‍ॅड. सुषमा बेंद्रे, प्रसाद चौगुले, प्रशांत पाटील.

स्थळ : हॉटेल फेअरफील्ड मेरियॉट, काकती.

वेळ : मंगळवार, दि. 10 जून, सकाळी 10.30 वाजता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news