उचगाव : मार्कंडेय नदीतील पाणी पातळी झपाट्याने खालावत असल्याने सुळगेतील (हिं.) बंधाऱ्याला फळ्या घालण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत दै. पुढारीतून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल घेत पाटबंधारे खात्याने बंधाऱ्याला फळ्या घालून पाणी अडविले. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाळा लांबल्याने शिवारातून ओल टिकून होती. याचा फटका सुगीच्या कामांना बसत होता. त्यामुळे पाणी अडवण्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांत झपाट्याने पाणीपातळीत घट झाली. यामुळे शेतकऱ्यांतून पाणी अडवण्याची मागणी करण्यात येत होती. मार्कंडेय नदीतील पाण्याचा वापर रब्बी हंगामातील भाजी पिकांसाठी केला जातो. किमान फेब्रुवारी अखेरपर्यंत नदीमध्ये पाणी टिकून राहणे आवश्यक असते. याचा उपयोग शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पाणी अडवण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत दै. पुढारीतून दि. 17 रोजी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत बुधवारी सुळगा येथील बंधाऱ्याला फळ्या घालण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.