बेळगाव : गणेशपूरजवळील महालक्ष्मीनगर येथे सहा लाखांची घरफोडी झाल्याची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे. याप्रकरणी प्रदीप बाबू वाडेकर (रा. दुसरा क्रॉस, अव्वा क्वॉटर्ससमोर, भारतनगर, महालक्ष्मीनगर, गणेशपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 31 डिसेंबर रोजी सायंकाळी फिर्यादी टिळकवाडीतील इस्कॉन मंदिरला गेले होते. सायंकाळी सात ते पावणेआठच्या सुमारास चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील 40 ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र व अन्य सोन्याचे दागिने पळवून नेले. 68 ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची चोरी झाल्याची फिर्याद घरमालकाने दिली आहे. वडगाव पोलिसांत नोंद झाली असून पोलिस निरीक्षक नागनगौडा कट्टीमनीगौडर तपास करीत आहेत.