बेळगाव-कोलम विशेष रेल्वे; अयाप्पा स्वामी भक्तांची सोय file photo
बेळगाव

Special Train : बेळगाव-कोलम विशेष रेल्वे; अयाप्पा स्वामी भक्तांची सोय

बेळगाव-कोलम विशेष रेल्वे; अयाप्पा स्वामी भक्तांची सोय

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : जिल्ह्यातील अवाप्पा स्वामी भक्तांच्या सोयीसाठी कोलम येथील सबरीमलाला जाण्यासाठी हुचळी कोलम, बेळगाव कोलम अशी विशेष रेल्वे सुरू केली आहे. प्रत्येकी सहा फेऱ्या आहेत. प्रवाशांची अधिक गर्दी लक्षात घेऊन ही रेल्वे सुरू केली आहे, अशी माहिती खासदार इराण्णा कडाडी यांनी दिली.

हुबळीतून ५ डिसेंबर, तर बेळगावातून ९ डिसेंबरपासून ही रेल्वे धावेल. रेल्वे (०७३१३) हुबळी कोलमदरम्यान ५, १२, १९ व २६ डिसेंबर तसेच २ व ९ जानेवारी या दरम्यान एकूण सहा रेल्वे धावणार आहेत. रेल्वे (०७३१४) कोलम- हुबळी या दरम्यान ६, १३, २० आणि २७ डिसेंवर व ३६ १० जानेवारीदरम्यान एकूण सहा फेच्या होणार आहेत. रेल्वे (०७३१७) बेळगाव कोलम या दरम्यान ९, १६, २३ व ३० आणि ६ व १३ जानेवारीदरम्यान ही रेल्वे धावणार आहे. रेल्वे (०७३१८) कोलम बेळगाव या दरम्यान १०,१७, २४ आणि ३१ तसेच ७ व १४ जानेवारीला धावणार आहे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातून सुमारे ५० हजार भाविक अयप्पा स्वामींच्या दर्शनासाठी जात आहेत. मध्य रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि व्ही. सोमश्रा आणि नैकल्य रेल्वेचे जी. एम. यांच्याशी चर्चा केली. अयप्पा स्वामी भक्ताच्या फायद्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरू करण्याची विनंती करण्यात आली.

बेळगाव, खानापूर, लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेजूर, हरिहर, दावणगिरी, बिरूर, अरसीकेरे, तुमकूर, बंगळूर, कृष्णराजपुरम, अंगारपेट, एर्नाकुलम, कोट्टायम, कोलम आदी स्टेशनवर ही रेल्वे प्रवासी घेण्यासाठी थांबेल जिल्ह्यातील भाविकांनी या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT