बेळगाव

बेळगाव : बहिण भावाच्या अपघाती मृत्यूनंतर रस्त्याच्या प्रश्नावरून नागरिक रस्त्यावर

backup backup

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : होसुर येथील बहिण-भावाचा मोटारसायकलीचा अपघात झाला. त्यामध्ये भाऊ जखमी झाला, तर बहीण ममता व्हडगेचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्त्याचा प्रश्‍न तीव्र झाला आहे. आमदार राजेश पाटील यांनीही शासकीय यंत्रणेला खड्डे भरण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले, पण अद्याप याबाबत कार्यवाही झाली नसल्याने आज संतप्त नागरिक प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुपारी बारा वाजता रस्त्यावर उतरले. (Belgaum)

ज्या खड्ड्यामुळे ममता व्हडगे या तरुणीला जीव गमवावा लागला. त्या खड्डयाभोवती उपस्थितांनी रांगोळी घातली. खड्डे फुलांनी सजविले. शासकीय यंत्रणेच्या विरोधात घोषणा देऊन रोष व्यक्त केला. रस्त्यावर लोकांचे जीव जात असताना शासकीय अधिकारी झोपा काढत आहेत का, असा प्रश्न उपस्थित करून उपस्थितांनी ममताला श्रद्धांजली वाहिली.

प्रा. दीपक पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करून सोमवार (ता.२१) पर्यंत रस्त्यावरील खड्डे भरले नाहीत, तर ज्यांना आंदोलन उभे करून अधिकार यांच्यावर जबाबदारी निश्चित करू असा इशारा दिला. (Belgaum)

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT