बेळगाव : शहरात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे आचार्य गल्ली शहापूरमध्ये पद्मावती नरहरी गलगली यांच्या घराच्या भिंतीचा काही भाग कोसळला. घराच्या मातीच्या भिंतीवर सतत पाणी पडत राहिल्याने काही भाग कोसळला.
हा भाग बाहेरच्या बाजुला कोसळल्यामुळे जीवितहानी झाली नाही. नगरसेवक जयंत जाधव यांनी याप्रकरणी महापालिका अधिकारी व तलाठ्यांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.