बेळगाव

बेळगाव : धावत्‍या बसचा टायर निखळला अन् मोठा अनर्थ टळला

निलेश पोतदार

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव ते गोल्याळी या मार्गावर बिजगर्णी (ता. बेळगाव) येथे आज ( दि.१२ ) सकाळी सात वाजता धावत्या बसचा टायर निखळून अपघात झाला. टायर पुढे गेला अन् बस जागच्या जागीच थांबली. मात्र समोरून येणाऱ्या कारचालकाने प्रसंगावधान राखून आपले वाहन बाजूने पुढे नेल्याने मोठा अनर्थ टळला.

या विषयी अधिक माहिती अशी की, बेळगाव ते गोल्याळी ही बस नेहमीप्रमाणे बेळगाव बस स्थानकातून पहाटे 6.30 वाजता सुटली. सात वाजता बिजगर्णी येथे बस आली असता नटबोल्ट तुटून अचानकपणे टायर निखळला आणि बसच्या पुढे गेला. बस जागीच थांबली. या घटनेमध्ये सुदैवाने बसमधील कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. या रस्त्या शेजारी दरी अथवा खड्डा असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी चर्चा घटनास्थळी होती.

राज्य परिवहन विभागाकडून ग्रामीण भागात खराब बसेस सोडल्या जात असल्याचा आरोप ग्रामीण भागातील प्रवाशांमधून होत आहे. बस दुपारी बारापर्यंत जागच्या जागीच थांबून होती.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT