Public Disorder Incident
बेळगाव : आयपीएल चषक आरसीबीने जिंकल्यानंतर शहरात सर्वत्र जल्लोष साजरा झाला. या काळात काही युवकांनी गोंधळ निर्माण करत पोलिसांना धक्काबुक्की केली होती, शिवाय एका तरुणावर चाकू हल्ला झाला होता.
या प्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 3 जूनरोजी रात्री आरसीबी संघाने चषक जिंकल्यानंतर येथील चन्नम्मा सर्कलमध्ये मोठी गर्दी जमली होती. यावेळी जल्लोष करताना गोंधळ उडाला. यावेळी एका तरुणावर चाकू हल्ला देखील झाला.
जमावाला पांगवत असताना मार्केटचे निरीक्षक महांतेश धामण्णवर यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणी मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर दोघे संशयित फरारी होते. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोघांना अटक करण्यात आली आहे.