बेळगाव : बोलेरोने रस्त्याकडेला पार्किंग केलेल्या 13 दुचाकी चिरडल्याची घटना शुक्रवारी रात्री किल्ला तलावाजवळील लेक व्ह्यू हॉस्पिटलजवळ घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. सुदैवाने कोणीही नसल्याने अनर्थ टळला.
लेक व्ह्यू हॉस्पिटलसमोर रुग्णांच्या नातेवाईकांनी दुचाकी पार्क केल्या होत्या. शुक्रवारी रात्री महांतेशनगरहून येणार्या बोलेरोे चालकाचे नियंत्रण सुटल्याने हॉस्पिटलसमोर पार्किंग केलेल्या दुचाकींवर बोलेरो आदळली. यामध्ये 6 दुचाकी पूर्ण, तर 7 दुचाकींचे थोडे नुकसान झाले आहे. चालक मद्य पिऊन वाहन चालवत असल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे.? घटनेनंतर? ? परिसरात काही वेळ गोंधळ उडाला होता. . तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रहदारी उत्तर विभागाचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसंनी त्या चालकाला? ? ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.