Almatti Sam Capacity
बेळगाव : पावसाळ्यात पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्या आणि त्यानंतर वर्षभर राजकीय वादाचे आणि सामाजिक आंदोलनाचे कारण बनणार्या अलमट्टी जलाशयात तब्बल 7.556 टीएमसी गाळ असल्याचे उघडकीस आले आहे. केएआरएस (कर्नाटाक अभियांत्रिकी संशोधन केंद्राने 2023 मध्ये केेलेल्या अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. या गाळामुळे जलाशयातील पाणी क्षमता 115.552 टीएमसी इतकी कमी झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राने (केईआरएस) 2023 मध्ये केलेल्या अलमट्टी जलाशयासह राज्यातील विविध जलाशयांच्या बॅकवॉटर सेडिमेंट अभ्यासाच्या अंतिम अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाचा संपूर्ण अहवाल संबंधित जलाशयांच्या मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आला आहे. अलमट्टी जलाशयातील पाणीसाठ्यात 6.1 टक्के घट झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
अलमट्टी जलाशयाच्या बॅकवॉटरपासून हिप्परगी जलाशयाच्या पाण्यापर्यंत 487 चौरस कि.मी.चा अभ्यास करण्यात आला आहे. सतत तीन महिने हा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती संशोधन केंद्राचे संचालक के. जी. महेश यांनी दिली आहे. अलमट्टीसह राज्यातील विविध जलाशयांमधील गाळाचा अभ्यास करून त्याची कारणे आणि परिणामांचा सविस्तर अहवाल संबंधित अधिकार्यांना सादर करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
बोटीवर बसवलेल्या इको साउंड सिस्टीममधून उत्सर्जित होणार्या ध्वनी लहरी पाण्याच्या खोलीत सोडल्या गेल्या आणि त्यातून येणार्या प्रतिध्वनींच्या आधारे, पाण्याचे आणि गाळाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी उपकरणात स्थापित केलेल्या नवीन सॉफ्टवेअरचा वापर करून अभ्यास करण्यात आला. अभ्यासातील डेटाचे पूर्णपणे वैज्ञानिकदृष्ट्या विश्लेषण करण्यात आले आहे, असेही सांगण्यात आले आहे. अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे.
बेळगाव : पावसाळ्यात पूरस्थितीला कारणीभूत ठरणार्या आणि त्यानंतर वर्षभर राजकीय वादाचे आणि सामाजिक आंदोलनाचे कारण बनणार्या अलमट्टी जलाशयात तब्बल 7.556 टीएमसी गाळ असल्याचे उघडकीस आले आहे. केएआरएस (कर्नाटाक अभियांत्रिकी संशोधन केंद्राने 2023 मध्ये केेलेल्या अभ्यासाचा अहवाल समोर आला आहे. या गाळामुळे जलाशयातील पाणी क्षमता 115.552 टीएमसी इतकी कमी झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
अलमट्टी जलाशयात पाणी साठवण सुरू झाल्यापासून 2023 पर्यंत 22 वर्षांत जलाशयात 7.556 टीएमसी गाळ जमा झाला आहे. अलमट्टी जलाशयाची कमाल साठवण क्षमता 123.081 टीएमसी आहे. पण गाळामुळे आता ती कमी झाली आहे. अलमट्टी जलाशयाची पाणी साठवण क्षमता 115.552 टीएमसी झाली असली तरी, सिंचनासह इतर वापरासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही, असे केबीजेएनएलने म्हटले आहे.
कर्नाटक अभियांत्रिकी संशोधन केंद्राने (केईआरएस) 2023 मध्ये केलेल्या अलमट्टी जलाशयासह राज्यातील विविध जलाशयांच्या बॅकवॉटर सेडिमेंट अभ्यासाच्या अंतिम अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अभ्यासाचा संपूर्ण अहवाल संबंधित जलाशयांच्या मुख्य अभियंत्यांना सादर करण्यात आला आहे. अलमट्टी जलाशयातील पाणीसाठ्यात 6.1 टक्के घट झाली आहे, असा दावा करण्यात आला आहे.
अलमट्टी जलाशयाच्या बॅकवॉटरपासून हिप्परगी जलाशयाच्या पाण्यापर्यंत 487 चौरस कि.मी.चा अभ्यास करण्यात आला आहे. सतत तीन महिने हा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती संशोधन केंद्राचे संचालक के. जी. महेश यांनी दिली आहे. अलमट्टीसह राज्यातील विविध जलाशयांमधील गाळाचा अभ्यास करून त्याची कारणे आणि परिणामांचा सविस्तर अहवाल संबंधित अधिकार्यांना सादर करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.
अलमट्टी जलाशयात पाणी साठवण सुरू झाल्यापासून 2023 पर्यंत 22 वर्षांत जलाशयात 7.556 टीएमसी गाळ जमा झाला आहे. अलमट्टी जलाशयाची कमाल साठवण क्षमता 123.081 टीएमसी आहे. पण गाळामुळे आता ती कमी झाली आहे. अलमट्टी जलाशयाची पाणी साठवण क्षमता 115.552 टीएमसी झाली असली तरी, सिंचनासह इतर वापरासाठी पाण्याची कमतरता भासणार नाही, असे केबीजेएनएलने म्हटले आहे.
राज्य सरकारकडून अलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत उंची वाढविण्यासाठी भूसंपादनासाठी खरेदी दर ठरवण्यात आला आहे. पण, जलाशयाची उंची वाढवण्यापेक्षा साचलेला गाळ काढला तर साठवण क्षमता टिकून राहिल, असेही बोलले जात आहे.