दर्शनला सुविधा, 'परप्पन'वर वरवंटा  File Photo
बेळगाव

दर्शनला सुविधा, 'परप्पन'वर वरवंटा

पुढारी वृत्तसेवा

बंगळूर : रेणुकास्वामी हत्याप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता दर्शनला परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहात विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर सरकारने कारागृह विभागावर मोठी कारवाई केली आहे. प्रशासकीय कारणास्तव कारागृह अधिकारी, मुख्य निरीक्षक, निरीक्षक आणि वॉर्डनसह ४३ जणांच्या बदल्यांचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला.

रेणुकास्वामी हत्याकांडातील आरोपी अभिनेता दर्शनला बळ्ळारी मध्यवर्ती कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलविण्याची विनंती केल्याचेही समोर आले आहे. त्याची पत्नी विजयालक्ष्मी, भाऊ दिनाकर तोगुदीप आणि वकिलांनी गुरुवारी कारागृहात जाऊन त्याची भेट घेतली. संध्याकाळी पुन्हा जेलमध्ये जाताना दर्शनने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडून पाहून बोट दाखवल्याने दर्शन पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे.

याबाबत कारागृह अधिकाऱ्यांनी दर्शनची चौकशी करून त्याने वकिलासोबत कोणती चर्चा केली याबाबत विचारणा केली. तुम्हाला अडचण असेल, तर माझी दुसऱ्या कारागृहात रवानगी करा, असे दर्शनने अधिकाऱ्यांशी बोलताना सांगितले. याशिवाय दर्शनने आपल्याला टीव्ही उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे बोलले जात आहे; पण अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही.

परप्पन कारागृहातून नवीन पदांवर बदली झालेले अधिकारी असे शंभू षण्मुगप्पा वेण्णाल, जेलर-मध्यवर्ती कारागृह बंगळूर, सुमित्रा एम. राठोड, मुख्य निरीक्षक- मध्यवर्ती कारागृह विजापूर, गणपती, हेड बॉर्डर-सागर सब जेल, बसवराज जाधव, हेड बॉर्डर-सेंट्रल जेल, धारवाड, प्रभू, हेड वॉर्डर- मध्यवर्ती कारागृह, गुलबर्गा, शैला सी.के. मुख्य निरीक्षक जिल्हा कारागृह, दावणगिरी, जी. जी. मंजुनाथ, निरीक्षक तालुका उपकारागृह, हुबळी, संतोष करियण्णावर, निरीक्षक-जिल्हा कारागृह, दावणागिरी, शिवानंद धनपाल कांबळे, निरीक्षक- विजापूर मध्यवर्ती कारागृह, शिव लमाणी, निरीक्षक जिल्हा कारागृह गदग, नुराली मुजावर, निरीक्षक- मध्यवर्ती कारागृह विजापूर, शिवकुमार, निरीक्षक - मध्यवर्ती कारागृह गुलबर्गा, मंजुनाथ कटगी, निरीक्षक हावेरी जिल्हा कारागृह.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT