Nashik Forest | वनविभागात खांदेपालट ; तात्पुरत्या स्वरुपात अधिकाऱ्यांच्या बदल्या

175 वनक्षेत्रपालांची पदोन्नती
Transfer
वनविभागात अधिकाऱ्यांचे खांदेपालटfile photo
Published on
Updated on

नाशिक : वनविभागातील वनक्षेत्रपाल संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदली तसेच सहायक वनसंरक्षकपदी पदोन्नतीचे आदेश मंत्रालयातून काढण्यात आले आहेत. महसूल व वनविभागाचे अवर सचिव आनंदा शेंडगे यांनी हे आदेश काढले असून, १७५ वनक्षेत्रपालांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

दरम्यान, या पदोन्नत्यांबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून तात्पुरत्या स्वरूपात या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने या आदेशाला मान्यता दिलेली आहे.

पदोन्नतीमुळे आता पश्चिम वनविभागातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला वनपरिक्षेत्राचे तसेच पूर्व वनविभागातील दिंडोरी, सटाणा, ताहाराबाद प्रादेशिकसह सुरगाणा, सप्तशृंगगड, वणी फिरते पथक व सामाजिक वनीकरण बागलाण, मालेगाव वनपरिक्षेत्राचे अधिकारी यांची बदली झाली आहे. त्यामुळे या रिक्त पदांवर आता नव्याने वनपरिक्षेत्र अधिकारी यांची नियुक्ती होणार आहे.

Transfer
Nashik Rain Update | नाशिकमध्ये तासाभरात १३ मिमी पाऊस

बदली झालेले अधिकारी

नाव -सध्या कार्यरत -बदली झालेले

वृषाली गाडे - नाशिक, पश्चिम भाग - वनव्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर

पूजा जोशी - दिंडोरी, प्रा. पूर्व भाग - कार्य आयोजना, नागपूर

राजेश पवार - त्र्यंबकेश्वर प्रा. पश्चिम भाग - वाहतूक व विपनन विभाग, बल्लारशाह

केतन बिरारीस - इगतपुरी प्रा. - बाेर व्याघ्र प्रकल्प, वर्धा

अक्षय म्हेत्रे - येवला, प्रा. पूर्व भाग - प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालय, नागपूर.

अमोल आडे - कळसूबाई अभयारण्य, भंडारदरा - पश्चिम नाशिक, प्रा. वनविभाग

प्रशांत खैरनार - सटाणा प्रादेशिक - पश्चिम नाशिक, प्रादेशिक

नीलेश कांबळे - सामाजिक वनीकरण, चांदवड - पश्चिम नाशिक प्रा. (जंकास व कॅम्पा)

राहुल घरटे - फिरते पथक, सुरगाणा, प्रादेशिक व वन्यजीव, शिरपूर, धुळे वनविभाग

संजय पवार - फिरते पथक, वणी - प्रादेशिक व वन्यजीव, मेवासी वनविभाग

मंगेश शर्मा - सप्तशृंगगड - फिरते पथक, यावल अभयारण्य, वन्यजीव

शिवाजी सहाणे - ताहाराबाद, प्रादेशिक - पूर्व वनविभाग, स्थित चांदवड

प्रवीण सोनवणे - सामाजिक वनीकरण, बागलाण - वनसंपत्ती सर्वेक्षण घटक, नाशिक

संतोष सोनवणे - सामाजिक वनीकरण, मालेगाव - जंकास व कॅम्पा, पूर्व नाशिक, वनविभाग.

कौतिक ढुमसे - देवळा, प्रा. पूर्व भाग - सामाजिक वनीकरण, धुळे

अश्विनी दिघे - सामाजिक वनीकरण, श्रीगोंदा - अहमदनगर (रोहयो व कॅम्पा)

जयवंत वलवे - सामाजिक वनीकरण, श्रीरामपूर - जंकास व कॅम्पा, मेवासी

कैलास अहिरे - सामाजिक वनीकरण, यावल - सामाजिक वनीकरण, जळगाव

महेंद्रकुमार पाटील - माळढोक अभयारण्य, श्रीगोंदा - सामाजिक वनीकरण, अहमदनगर

रवींद्र भोगे - फिरते पथक, अहमदनगर - सामाजिक वनीकरण, नाशिक

योगेश सातपुते - सामाजिक वनीकरण, चोपडा - जंकास व कॅम्पा, धुळे

शिरीषकुमार निरभवणे - सामाजिक वनीकरण, कर्जत, अ.नगर - रोहयो-वन्यजीव, पश्चिम नाशिक

सत्यजित निकत - अनेर डॅम, वन्यजीव, शिरपूर - यावल अभयारण्य, वन्यजीव, नाशिक

समाधान पाटील - सामाजिक वनीकरण, जामनेर - प्रादेशिक व कॅम्पा, यावल

अमोल पंडित - जामनेर, प्रादेशिक - रोहयो व वन्यजीव, जळगाव

अमोल चव्हाण - पाल, वन्यजीव - सामाजिक वनीकरण, नंदुरबार

सोनल कोंडुस्कर - सामाजिक वनीकरण, कागल - सामाजिक वनीकरण, अहमदनगर

ज्ञानोबा आडकिने - पिंपळनेर प्रादेशिक - कार्य आयोजना, धुळे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news