कोन्नूरात साकारतात शाडूच्या गणेशमूर्ती Pudhari Photo
बेळगाव

कोन्नूरात साकारतात दरवर्षी ३ लाख शाडूच्या गणेशमूर्ती

कोन्नूरातील गणेशमूर्तींना कर्नाटकसह महाराष्ट्रातूनही मागणी

पुढारी वृत्तसेवा

गोकाक : पुढारी वृत्तसेवा

घटप्रभा रोड कोन्नुर येथे दरवर्षी 16 कुटुंबे मिळून सुमारे तीन लाख शाडूच्या गणेशमूर्ती तयार करतात. या मूर्तींना कर्नाटकासह महाराष्ट्रातून मागणी वाढली असल्याची माहिती कोन्नूर येथील मूर्तीकारांनी दै. पुढारीच्या प्रतिनिधीला दिली.

दरवर्षी प्रदूषण नियंत्रण महामंडळ पीओपी मूर्तीवर बंदी घालून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पुजवण्यावर भर देण्यासाठी जनजागृती करत आहे. कर्नाटकात एकमेव कोन्नूर (ता. गोकाक) येथे केवळ शाडूपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम चालते. सुरुवातीला 9 कुटुंबे एकत्र येऊन पर्यावरणपूरक शाडूपासून गणेशमूर्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यातून गणेशमूर्ती पुरवण्यासाठी सोसायटी स्थापन झाली. सुरुवातीलाच एक लाख शाडूच्या गणेशमूर्ती तयार झाल्या. त्यानंतर होलसेल ग्राहकांना एकाच छताखाली शाडूपासून रंगवून तयार गणेशमूर्ती मिळू लागल्या. या व्यवसायाने आता बाळसे धरले असून, कोन्नुरात वर्षभर 16 कुटुंबे शाडूपासून गणेशमूर्ती बनवण्याचे काम करत असून यंदा तीन लाख गणेशमूर्ती बनवण्याची ऑर्डर त्‍यांना मिळाली आहे.

शाडूपासून बनवलेल्‍या मूर्तीचे विसर्जन लवकर होते. या मूर्तीचे विसर्जन घरात बादलीत अथवा टबमध्ये देखील करता येते. पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचे विसर्जन कित्येक महिने होत नाही. त्या शिवाय मूर्तींची विटंबनाही होते. त्यामुळे गणेशभक्तांचा कल शाडूच्या मूर्ती पुजण्याकडे वाढला आहे.

या ठिकाणी निर्यात होतात शाडूच्या मूर्ती

बेळगाव, खानापूर, निपाणी, हुबळी, विजापूर, धारवाड, बंगळूर, राणेबन्नूर, हावेरी, महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, इंचलकरंजी, लातूर या भागात कोन्नूर येथील शाडूच्या गणेशमूर्ती निर्यात होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT