पुढारी ऑनलाईन: सोशल मीडियावरून एकापेक्षा एक भन्नाट व्हिडिओ समोर येत आहेत. यामधील काही व्हिडिओ हसवून जातात, तर काही प्रेरणा देवून जातात. असाच तुम्हाला डाेळे विस्फारायला लावणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला स्कायडायव्हिंग करण्यापूर्वी हवेत एक्सरसाइज करताना पाहायला मिळत आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवरच विश्वास बसणार नाही.
जमिनीपासून कित्येक हजार फूट उंचावर जाऊन आकाशातून हवेत उडी घेणे हे जितके धोकादायक असते, तितकाच हा प्रवास रोमांचकारी देखील असतो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील या महिलेच्या धाडसाचे काैतूक कराल. या व्हिडिओमध्ये ही महिला प्रथम विमानाजवळच हवेत एक्सरसाइज करते. त्यानंतर हातांची पकड सैल करत, आकाशातून जमिनीच्या दिशेने हवेत झेपावते. या महिलेचा स्कायडायव्हिंगचा हा व्हिडिओ पाहून कोणालाही घाबरायलाच होईल, हे यातून स्पष्टपणे दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'एब्स वर्कआउट करण्याचा एकमेव मार्ग.(आरारा खतरनाक!)' सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सनेदेखील याला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. एका यूजरने महटले आहे की 'खूप भयानक…ओह मॉय गॉड'. आत्तापर्यंत 5.7 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.