Latest

“कोणताही संघर्ष असो, प्रत्येक आव्हानाला तयार”, लष्कर प्रमुख मनोज पांडे

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : "जगातील वेगाने बदलणारी भौगोलिक-राजकीय परिस्थिती असो किंवा सीमेवरील कोणताही संघर्ष असो, हवाई दल आणि नौदलासह भारतीय लष्कर सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतीय लष्कराचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे, ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि सन्मानाची बाब आहे. ज्याचा मी नम्रपणे स्वीकार करतो. भारतीय लष्कर स्वातंत्र्याच्या मूल्यांसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी माझी जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडू शकेन अशी मी देवाकडे प्रार्थना करतो", असे लष्करप्रमुख मनोज पांडे म्हणाले.

२९ वे लष्करप्रमुख झाल्यानंतर जनरल मनोज पांडे यांनी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजेच राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर साऊथ ब्लॉकमधील लॉनमध्ये त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जनरल मनोज पांडे यांनी सांगितले की, "भारतीय लष्कराने आजवर ज्या प्रकारे देशाची सुरक्षा आणि अखंडता राखण्यासाठी खूप काही केले आहे, त्यावरून मी देशवासियांना आश्वस्त करू इच्छितो की. सेना ते कायम ठेवेल." असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

"जगातील झपाट्याने बदलणारी भौगोलिक-राजकीय परिस्थिती असो किंवा इतर कोणतेही आव्हान असो, भारतीय लष्करासह इतर सेवा कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. तिन्ही दल (लष्कर, हवाई दल आणि नौदल) एकत्रितपणे समन्वयाने काम करतील." चीन आणि पाकिस्तानला भेडसावणाऱ्या आव्हानांच्या प्रश्नावर जनरल पांडे म्हणाले की, "आमचे प्राधान्य ऑपरेशनल सज्जतेवर असेल आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जाईल. आपापसातील शक्तींचे संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील."

नियंत्रण रेषेवर संपूर्ण इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व 

६ मे १९६२ रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त झाले. एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमीमधून उत्तीर्ण झाल्यानंतर ते लष्कराच्या इंजिनिअरिंग कॉर्प्सच्या 'बॉम्बे-सॅपर्स' युनिटमध्ये रुजू झाले. ३९ वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत त्यांनी पाकिस्तानच्या सीमेवर स्ट्राइक कॉर्प्सच्या इंजिनीअरिंग-ब्रिगेडचे नेतृत्व केले आणि नियंत्रण रेषेवर संपूर्ण पायदळ ब्रिगेडचे नेतृत्व केले. यानंतर, त्यांनी लडाखमधील माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले आणि नंतर उत्तर-पूर्व राज्यात चीनला लागून असलेल्या एलएसीवर तैनात असलेल्या कॉर्प्सचे नेतृत्व केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT