vishal nikam  
Latest

BBM-३ चा विजेता विशाल निकम याने केले आवाहन, ‘कोरोनामुळे गर्दी टाळा’

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस मराठी-३ चा विजेता विशाल निकम याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. सध्या तो सांगली येथील त्याच्या गावी आहे. त्याला भेटायला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने त्याचे चाहते येत आहेत. शिवाय, जागोजागी त्याचे सत्कार समारंभ, मिरवणुका काढण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र, या दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रार्दूभाव लक्षात घेता, विशाल निकम याने त्याला भेटण्यास येणाऱ्या चाहत्यांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.

गेली अनेक दिवस देवीखिंडी गावात दिवाळीचा माहौल आहे. त्याच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे, एक सजग नागरिक या नात्याने त्याने भेटीगाठी काही दिवस थांबवत असल्याचं सांगितलं आहे.

तो म्हणतो, " जिंकल्याचा उत्साह आहे, आनंद आहे, मोठ्या संख्येने तुम्ही मला भेटायला येताहेत, तुमचं नेहमीच स्वागत!!
मात्र, मित्रांनो काही दिवस ब्रेक घेऊयात, महाराष्ट्र सरकारच्या निर्देशांचं पालन करूयात. आपल्याला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखायचा आहे, सदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यामुळे आजपासून तीन दिवस एकमेकांपासून दूर राहूयात. ऑनलाईन भेटीगाठी तर होतच राहतील, सोशल डिस्टन्सिंग तेवढं काही दिवस पाळुयात… तर मग आपलं ठरलं प्रसारमाध्यमे आणि सर्व चाहत्यांना मी ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन भेटीन! नाराज होऊ नका भावांनो… जबाबदारी आहे, काटेकोरपणे पालन करूयात. लवकरच मुंबईत येणार आहे, तेव्हा भेटूयात ".

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जागोजागी होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळेच विशालने समाजभान जपत, उत्साहाला आवर घालण्याची विनंती पाहुण्यांना केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT