पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'बॅस्टिल डे' परेडला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा १४ जुलै रोजी होणार आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पंतप्रधान मोदींना पॅरिसमधील परेडमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ( Bastille Day)
अधिकृत निवेदनानुसार, भारतीय सशस्त्र दलांची तुकडी त्यांच्या फ्रेंच समकक्षांसोबत परेडमध्ये सहभागी होणार आहे. पीएम मोदींच्या दौऱ्यामुळे आमच्या धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्यासाठी नवीन आणि महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करून भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्याची सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे, ज्यात उद्योगांच्या विस्तृत श्रेणीचा समावेश आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक भेटीमुळे हवामान बदल, जैवविविधता नष्ट होणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करणे यासह आपल्या काळातील महत्त्वाच्या आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी समान उपक्रम राबविले जातील आणि भारत आणि फ्रान्ससाठी त्यांच्या हितसंबंधासाठी संधी असेल.
बॅस्टिल डे परेड ही फ्रेंच इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. १४ जुलै, १७८९ रोजी बॅस्टिल तुरुंगात झालेल्या घटनेच्या स्मरणार्थ बॅस्टिल डे साजरा केला जातो. जो फ्रेंच राज्यक्रांतीचा एक टर्निंग पॉइंट होता. परेड दरम्यान देशाच्या लष्करी आणि त्यांच्या कामगिरीचा उत्सव साजरा केला जातो.
हेही वाचा