पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'पुण्यातील भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे राज्याच्या राजकारणातील चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. भाजपकडून शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.
पुण्यात राहुल पायगुडे यांनी अजित पवार यांचे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर 'विकासाचा वादा अजितदादा' असे लिहिले आहे. त्याचबरोबर 'होय म्हणूनच भावी मुख्यमंत्री फक्त अजितदादा पवार' असेही बॅनरवर लिहिण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पुन्हा येईन' या व्हिडीओनंतर आता अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत.
हेही वाचा