पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही बॅंकेच्या कामानिमित्त घरातून बाहेर पडत असाल, तर हे जाणून घ्या की, २ ते ४ मेपर्यंत बॅंकेचे कामकाज बंद असणार आहे. बॅंकांची ही सुट्टी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्यां तारखांना असते. त्यामुळे बॅंकांची काम करताना आपल्या शहरातील बॅंक बंद आहे की, नाही हे तपासा. मे महिन्याच्या सुरुवातीला बॅंक सलग बंद राहत आहे. (Bank Holidays)
२ मे रोजी परशुराम जंयती आहे, त्यामुळे बॅंकाचे कामकाज बंद राहिलेले आहे. त्याचबरोबर उद्या (३ मे) रमजान ईदमुळे देशातील अनेक शहरांमध्ये बॅंका बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर तेलंगणामध्ये ४ मे रोजी बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.
राज्यांनुसार बॅंकांना वेगवेगळ्या तारखांना सुट्टी (Bank Holidays) दिलेली असते. तुम्ही तुमच्या शहरातील बॅंकाच्या सुट्टी तपासू शकता. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियकडून बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली असते. कारण, ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी ही यादी जाहीर केलेली असते. ही यादी जाणून घेण्यासाठी https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या संकेतस्थळावर जाणून घ्या.
हे वाचलंत का?