पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलॅन्डला कोणी जमेत धरले नव्हते. मात्र बलाढ्य द. आफ्रिकेचा पराभव करत त्यांनी आपले स्पर्धेतील आस्तित्व सिध्द केले. स्पर्धेत बांगलादेशविरूद्दच्या सामन्यात 87 धावांनी दुसरा विजय मिळवला आहे. यामुळे नवख्या नेदरलॅन्डची आत्तापर्यतची कामगिरी गतविजेत्या इंग्लंडपेक्षाही भारी ठरली आहे. आजच्या तारखेला स्पर्धेत सहापैकी दोन सामने जिंकत गतविजेत्या इंग्लंडपेक्षा सरस कामगिरी नेदरलॅन्डने केली आहे. इंग्लंडने स्पर्धेत 5 सामने खेळत केवळ एकच विजय मिळवला आहे. तर नेदरलन्डने 6 सामन्यात दोन विजय मिळवत चार गुण आपल्या नावावर केले आहेत. या विजयामुळे नेदरलॅन्ड गुणतालिकेत आठव्या स्थानी पोहचला आहे. तर इंग्लंड आणि बांगलादेश तळात गेले आहेत. (BAN vs NED)
नेदरलॅन्डने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव 142 धावांवर आटोपला. यावेळी बांगलादेशचा एकही फलंदाज क्रीझवर जास्त वेळ टिकू शकला नाही. मेहदी हसन मिराजने सर्वाधिक 35 धावा केल्या. महमुदुल्लाह आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 20 धावा केल्या. मेहंदी हसन 17, तनजीद हसन 15 आणि तस्किन अहमदने 11 धावा केल्या. नझमुल हुसेन शांतो 9, शकीब अल हसन 5, लिटन दास 3 आणि मुशफिकुर रहीम 1 धावा करून बाद झाला. शरीफुल इस्लाम खाते न उघडता नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून पॉल व्हॅन मिकरेनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर बास डी लीडने दोन विकेट घेतल्या आणि आर्यन दत्त, कॉलिन अकरमन आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्तपूर्वी, सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करताना नेदरलँडचा डाव 50 षटकांत 229 धावांवर गुंडाळला. यामध्ये कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने 89 चेंडूत 68 धावा केल्या. त्याच्याशिवाय वेस्ली बॅरेसीने 41 आणि सायब्रँडने 35 धावांचे योगदान दिले. लोगान व्हॅन बीकने नाबाद 23, बास डी लीडेने 17 आणि कॉलिन अकरमनने 15 धावा केल्या. आर्यन दत्त नऊ, शरीझ अहमद सहा आणि विक्रमजीत सिंग तीन धावा करून बाद झाला. मॅक्स ओडाड आणि पॉल व्हॅन मीकरेन यांना खातेही उघडता आले नाही. बांगलादेशकडून शरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान आणि महेदी हसन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. शकीब अल हसनला यश मिळाले. (BAN vs NED)
हेही वाचा :