Latest

Balance on one leg : तुम्‍ही एका पायावर शरीराचे संतुलन करु शकता? जाणून घ्‍या शरीर संतुलनाचे महत्त्‍व…

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तुमचे शरीर निरोगी आहे का, या प्रश्‍नाचे उत्तर शरीराच्‍या संतुलनावरुन स्‍पष्‍ट होते. तुम्‍ही एका पायावर किमान १० सेंकद शरीराचा तोल संभाळल्‍यास तुम्‍ही गंभीर आजारापासून दूर आहात हे स्‍पष्‍ट होते. ( Balance on one leg )  तुम्‍ही या चाचणीत अपयशी ठरण्‍यास ते चिंतेचे कारण ठरु शकते. जाणून घेवूया शरीर संतुलनाच्‍या महत्त्‍वाविषयी ….

Balance on one leg : शरीर संतुलन म्‍हणजे काय?

तुम्‍ही किमान दहा सेंकद तरी एका पायावर उभे राहण्‍याचा प्रयत्‍न करा. तुम्‍ही तीन प्रयत्‍नांमध्‍ये तुमच्‍या ही कृती करण्‍यास अपयशी ठरल्‍यास हा तुमच्‍या आरोग्‍यासाठी एक इशारा ठरतो, असे 'ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसीन' केलेल्‍या अध्‍ययनात स्‍पष्‍ट झाले आहे . तसेच 'फॉलिंग इज नॉट अँड ऑप्‍शन' या पुस्‍तकाचे लेखक जॉर्ज लॉकर यांनीही शरीर संतुलनाचे महत्त्‍व आपल्‍या पुस्‍तकात नमूद केले आहे.

शरीराचे संतुलन हे मेंदूच्या समन्वित क्रियांद्वारे नियंत्रित केले जाते. या केंद्रासाठी योग्य संवेदना आवश्यक असतात. तुम्ही जमिनीच्या खडबडीत किंवा सपाट जमिनीवर उभे असाल तर तुमचे पाय तुम्हाला संवेदना देतात. तुमच्या व्हिज्युअल नर्व्हस ज्या तुम्हाला तुम्ही नेमके कुठे उभे आहात याची जाणीव करून देतात, त्यानंतर आतील कानाद्वारे समन्वित क्रिया केली जातो. जर तुम्‍ही एका पायावर किमान १० सेकंद शरीराचा तोल संभाळल्‍यास सक्षम नसला तर ते धाोक्‍याचा इशारा ठरु शकते.

शरीर संतुलन आणि मृत्यूचा धोका यांचा परस्‍पर संबंध

ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनने केलेल्‍या संशोधनामध्ये 51 ते 75 वयोगटातील 1,700 पेक्षा नागरिकांची चाचणी घेण्‍यात आली. सलग काही वर्ष यावर अभ्‍यास करण्‍यात आला. यामध्‍ये शरीर समतोल राखण्यास असमर्थता मृत्यूच्या धोक्यात जवळजवळ दुप्पट वाढीशी संबंधित असल्‍याचे आढळले. या संशोधनात सहभागी झालेल्‍या स्वयंसेवकांना तीन प्रयत्नांमध्ये 10 सेकंद एका पायावर उभे राहण्यास सांगितले होते, असे करण्यास असमर्थता 84 टक्के कोणत्याही कारणामुळे मृत्यूच्या जोखमीशी संबंधित असल्‍याचा निष्‍कर्ष या संशोधनात काढण्‍यात आला होता.

शरीर संतुलनाचे महत्त्‍व लक्षात घेणे आवश्‍यक

जागतिक आरोग्‍य संघटने(WHO) नुसार, दरवर्षी सुमारे 6, 84,000 जणांचा मृत्‍यू हा संतुलन नसल्‍यामुळे होतो. अचानक झालेल्‍या मृत्यूचे हे  प्रमुख कारणांपैकी एक होते. जी व्‍यक्‍ती समतोल राखू शकत नसेल, तिच्‍यामध्‍ये काही प्रमाणात कमतरता असते, असेही WHO म्‍हटलं आहे. त्‍यामुळे शरीर संतुलनाचे महत्त्‍व वेळीच लक्षात येणे आवश्‍यक आहे. तुम्‍ही योगासन किंवा जीममध्‍ये तुम्‍ही शरीर संतुलनाचा सराव करु कतायासंदर्भात तुम्‍ही तुमच्‍या डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याने योग्‍य व्‍यायाम व जीवनशैलीतून शरीर संतुलन राखण्‍याचा प्रयत्‍न करणे एका निरोगी जगण्‍यासाठी महत्त्‍वपूर्ण ठरते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT