मुंबई; पुढारी ऑनलाईन : 'बचपन का प्यार' या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला आणि इंटरनेटवर सर्वात जास्त सर्च केला जाणारा सहदेव दिर्डोचा ( sahadev dirdo accident ) मोठा अपघात झाला आहे. या अपघातात त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सध्या तो शुद्धीत नसल्याचे सांगितले जात आहे. छत्तीसगड राज्यातील सुकमा येथील जिल्हा रुग्णालायात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. गायक आणि रॅपर बादशहा याने याबाबत ट्वीट करुन सहदेव याच्या अपघाताची माहिती दिली आहे.
सहदेव दिर्डोहा ( sahadev dirdo accident ) सुकमा शहरातील रहवासी आहे. काही दिवसांपूर्वी 'बचपन का प्यार' हे गाणे गायले. या गाण्याने अवघ्या इंटनेट विश्वात धुमाकूळ घातला होता. हे प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले होते. गायक आणि रॅपर बादशहा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सहदेव बरोबर या गाण्याचे रिमिक्स करुन ते गाणे चित्रित करुन एक अल्बम देखिल काढला होता. सहदेव हा 'बचपन का प्यार' या गाण्यामुळे भारतातील घराघरात पोहचला आहे.
सहदेव ( sahadev dirdo accident ) हा मंगळवारी (दि. २८) आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन शबरी नगर येथे जात होता. गाडीवरील नियंत्रण गमावल्यामुळे त्याचा अपघात झाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्या डोक्याला चार टाके पडले आहेत. सुकमा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख सुनील शर्मा आणि जिल्हाधिकारी विनीत नंदनवार यांनी रुग्णालयात जाऊन सहदेवची चौकशी केली. जिल्हाधिकारी यांनी डॉक्टरांशी चर्चा करुन योग्य उपचाराबाबत सुचना केल्या आहेत. तसेच पुढील उपचारासाठी सहदेवला जगदलपूर येथे घेऊन जाण्याच्या सुचना केल्या आहेत.