नागपूर; पुढारी वृत्तसेवा: शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण मिळावं यासाठी आमची लढाई सुरू आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम, दलित या सगळ्यानी बलिदान दिले आहे. त्यामुळे शहिद आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही 'मेरा देश मेरा खून हे अभियान' राबवणार आहे, असे आमदार बच्चू कडू यांनी आज (दि.२९) बोलताना स्पष्ट केले. आयोध्येला रवाना होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार बच्चू कडू आजपासून दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमार्गे ते लखनौला गेले, तिथे त्यांचे जंगी स्वागत झाले. आयोध्येमध्ये ते प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच जाहीर सभेत देखील मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कापूस, तूर, सोयाबीन, कांदा या शेतमालाच्या भावासाठी प्रभू रामाला साकडे घालणार असून, सरकारला बुद्धी दे अशी ही प्रार्थना देखील करणार असल्याचे कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. (Bacchu kadu)