Latest

Ayodhya Ram Mandir : रामलल्लाची मूर्ती एक कोडे, कधी उलगडणार? देशभरात हुरहुर

Arun Patil

अयोध्या, वृत्तसंस्था : 22 जानेवारी रोजी अभिषेक समारंभापूर्वी मंदिर ट्रस्ट अयोध्येत तीन वेगवेगळ्या ठिकाणी अत्यंत गोपनीय पद्धतीने बनविल्या जात असलेल्या रामलल्लांच्या तीन वेगवेगळ्या मूर्ती हा देशभरातील भाविकांसाठी एक कोड्याचा विषय ठरला आहे. (Ayodhya Ram Mandir)

शिल्पकारांचे तीन गट प्रभू श्रीरामांचे बालरूप (ते 5 वर्षांचे असतानाचे) साकारत आहे. जे बालरूप अधिक लोभस असेल, ते तिन्ही मूर्तींतून निवडले जाईल. निवड झालेली मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गाभार्‍यात प्रतिष्ठापित केली जाईल. सर्वसामान्य लोक यानंतर 27 जानेवारीच्या पहाटेपासून रामलल्लाचे दर्शन घेऊ शकतील. (Ayodhya Ram Mandir)

तीन शिल्पकार, तीन पाषाण

रामलल्ला (बालरूप) मूर्तींसाठी तीन शिल्पकारांना त्यांच्या आवडीच्या पाषाणासह अयोध्येला खूप आधीच बोलावण्यात आले होते. यातील एक पाषाण म्हणजे राजस्थानातील पांढरा मकराना जातीचा संगमरवर, दुसरा भुरकट रंगाचा कर्नाटकातील कृष्ण शिला म्हणून ओळखला जाणारा, तिसराही संगमरवराचाच एक प्रकार…

सारे पाषाण आधी तपासले

मूर्तींसाठी आणलेले तसेच अन्य सर्वच प्रकारच्या कामांसाठी मागविण्यात आलेले सर्व प्रकारचे पाषाण केंद्र सरकारच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मॅकेनिक्सकडून तपासण्यात आलेले आहेत, हे आणखी एक विशेष!

मूर्ती आसनासह 7 फूट

तिन्ही मूर्तींची उंची 51 इंच असेल. हातात धनुष्यबाण असेल. आसनासह प्रत्येक मूर्तीची उंची जवळपास 7 फूट असेल. भक्तांनी 25 फूट अंतरावरून दर्शन घ्यायचे तर मूर्तीचा एवढा आकार आवश्यक आहे, असे विशेषज्ञांचे मत यात ध्यानात घेण्यात आले आहे.

मंदिराचे आणखी एक प्रेक्षणीय आकर्षण म्हणजे दर रामनवमीला दुपारी 12 वाजता मूर्तीच्या डोक्यावर सूर्यप्रकाश प्रतिबिंबित करण्याची यंत्रणा होय. ही यंत्रणा रुडकीतील केंद्रीय भवन संशोधन संस्थान आणि पुण्यातील खगोल भौतिक संस्थानने डिझाईन केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT