Latest

IPL 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार हे ऑस्ट्रेलियन खेळाडू

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचे अनेक मोठे खेळाडू पाकिस्तानविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळणार नाहीत. तरी देखिल हे खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ( IPL 2022 ) मधील सुरुवातीचे सामने सुद्धा खेळू शकणार नसल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएलच्या १५ व्या सिझनच्या तारखांची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही, परंतु आयपीएल मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर, हेझलवूड आणि कमिन्स हे पाकिस्तानमध्ये ४ मार्चपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाचा भाग आहेत. कसोटी मालिका २५ मार्चपर्यंत चालेल. पण, या खेळाडू समावेश २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी संघात करण्यात आलेला नाही.

मग, जे खेळाडू पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांचा भाग नाहीत ते खेळाडू आयपीएलमध्ये ( IPL 2022 ) देखिल सहभागी होणार नाहीत. याबाबत ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचे प्रमुख जार्ज बेली यांनी मंगळवारी सांगितले. पाकिस्तानमधील मर्यादित षटकांच्या सामन्यांचा भाग नसलेले पण, केंद्रीय करारात ज्यांचा समावेश आहे अशा खेळाडूंना पाकिस्तान सोबतची मालिका संपेपर्यंत आयपीएलमध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे वार्नर, हेझलवूड आणि पॅट कमिन्स हे पाकिस्तानातून मायदेशी परततील त्यानंतर ते भारतात आयपीएलसाठी जातील, असे जार्ज बेली यांनी स्पष्ट केले.

अष्टपैलू मिचेल मार्श, मार्कस टॉयनिस तसेच गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ, सीन ॲबॉट आणि नॅथन एलिस हे देखिल आयपीएलच्या ( IPL 2022 ) सुरुवातीच्या सामन्यास मुकणार आहेत. या खेळाडूंचा समावेश पाकिस्तामध्ये खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय आणि एका टी-२० सामन्यासाठी संघात करण्यात आला आहे.

बेली यावेळी पुढे म्हणाले, 'मी एक स्पर्धा म्हणून आयपीएलचा पूर्ण आदर करतो, मला वाटते की टी-२० सामन्यांमध्ये ती सर्वोच्च पातळी आहे. तसेच मला वाटते की आमच्या काही खेळाडूंच्या कौशल्य विकासासाठी ही खरोखरच महत्त्वाची स्पर्धा आहे, त्यामुळे याला कमी लेखू नका.'

बेली म्हणाले, "प्रोटोकॉलनुसार कोणताही केंद्रीय करार असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू ६ एप्रिलपर्यंत आयपीएल संघात सामील होण्यासाठी उपलब्ध होणार नाहीत. डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, नॅथन कुल्टर-नाईल आणि टिम डेव्हिड यासारखे खेळाडू क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कराराशी बांधील नाहीत. अशा परिस्थितीत, हे खेळाडू आयपीएलच्या सुरुवातीपासून फ्रँचायझी संघांमध्ये सामील होण्यास मोकळे असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT