Latest

ODI India vs Australia : भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेतून ऑस्ट्रेलियाचे दोन स्टार खेळाडू बाहेर, कारण…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ODI India vs Australia : भारताविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला दोन मोठे झटके बसले आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाचे दोन मोठे खेळाडू उपलब्ध नाल्याचे समोर आले आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्या गैरहजेरीत संघ मैदानात उतरेल अशी माहिती कर्णधार पॅट कमिन्सने सामन्याच्या एक दिवस आधी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

वास्तविक, ऑस्ट्रेलियन संघाचे अनेक खेळाडू दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेले नव्हते. यामध्ये कर्णधार पॅट कमिन्स, फलंदाज स्टीव्ह स्मिथ, अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांचा समावेश होता. तथापि, यापैकी दोन खेळाडू निवडीसाठी उपलब्ध आहेत आणि दोन खेळाडू किमान पहिल्या एकदिवसीय सामन्याला मुकतील, जो उद्या म्हणजेच शुक्रवार, 22 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळला जाणार आहे. (ODI India vs Australia)

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि ग्लेन मॅक्सवेल अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत आणि म्हणूनच पहिल्या वनडेतून बाहेर आहेत. तथापि, चांगली गोष्ट म्हणजे कर्णधार पॅट कमिन्स तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळणार आहे, जो दुखापतग्रस्त होता आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतून बाहेर होता. याशिवाय फलंदाज स्टीव्ह स्मिथ पूर्णपणे तंदुरुस्त असून तो या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेद्वारे 2023 च्या विश्वचषकाची तयारीही करणार आहे. (ODI India vs Australia)

भारताविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टार्कची कामगिरी कशी आहे?

टीम इंडियाविरुद्ध स्टार्कची कामगिरी चांगली आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. स्टार्कने या संघाविरुद्ध 33.64 च्या सरासरीने 25 बळी घेतले आहेत. या काळात त्याने 6.07 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी केली आहे. 43 धावांत 6 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत दोन वेळा 5 विकेट्स घेण्यास यश मिळविले आहे. (ODI India vs Australia)

भारतीय भूमी आणि आशियामध्ये स्टार्कची कामगिरी कशी आहे?

स्टार्कने 2010 मध्ये भारतीय भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतात एकूण 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 38.18 च्या निराशाजनक सरासरीने आणि 6.39 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 11 विकेट्स घेतल्या आहेत. आशिया खंडात स्टार्कने 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 23.08 च्या सरासरीने 37 विकेट घेतल्या आहेत. स्टार्कने 2023 मध्ये फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 21.12 च्या सरासरीने 8 विकेट्स घेतल्या आहेत. (ODI India vs Australia)

ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ (ODI India vs Australia)

पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, सीन अॅबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT