पुढारी ऑनलाईन डेस्क
अल्लू अर्जुनच्या ' पुष्पा द राईज" हा चित्रपटाची जगभरात चर्चा आहे. पुष्पा चित्रपटातील गाणी, डायलॉग्ज, अल्लू अर्जुनच्या डान्स स्टेप्सची सगळीकडे क्रेज आहे. याचदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या व्यक्तीने पुष्पा सिनेमा पाहुन त्यातील लालचंदन तस्करी करण्याचे अनुकरण केले आहे. बंगळूरमध्ये २.४५ कोटींची लालचंदनची तस्करी करण्याचा प्रयत्न या युवकाकडून करण्यात आला होता. यासीन इनायथुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. या युवकाने ट्रकमध्ये लालचंदन फळे आणि भाजीपाल्याखाली लपवले होते. महाराष्ट्रातून जाणाऱ्या कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळच्या रस्त्यावर लाल चंदनाने भरलेल्या ट्रक सोबत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आयएफएस अधिकारी देबाशीष शर्मा यांनी याबाबतचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, गाजलेले चित्रपट नेहमीच सामाजिक संदेश देत नाहीत. असे चित्रपट पहा, आनंद घ्या आणि नंतर विसरुन जावा. खऱ्या आयुष्यात पुष्पा होण्याचा प्रयत्न करू नका. वन विभागाने एका टनापेक्षा जास्त चंदन जप्त केले आहे. इनायथुल्ला याला महाराष्ट्रातून जाणाऱ्या कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमेजवळच्या रस्त्यावर लाल चंदनाच्या भरलेल्या ट्रक सोबत ताब्यात घेण्यात आले आहे. सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असतानाच सांगली पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. यासीनने मोठ्या चलाकीने ट्रकमध्ये लालचंदनावर फळे आणि भाज्यांचे डबे ठेवले होते. पोलिसांना संशय येणार नाही असे त्याला वाटत होते. मात्र तरीही पोलिसांकडून त्याला पकडले.
हेही वाचलतं का?