नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
बँकांनी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा एटीएम मधून पैसे काढणे (ATM Cash Withdrawal) नववर्षापासून महाग पडणार आहे. नवीन वर्षात अनेक वस्तू आणि सेवा महागणार आहेत, त्यात या सेवेचाही समावेश आहे. हे शुल्क वाढणार असल्याचे संदेश विविध बँकांकडून ग्राहकांना प्राप्तही होत आहेत.
एका महिन्यात ठराविक वेळाच एटीएम मधून मोफत पैसे काढता येऊ शकतात. ही मर्यादा संपल्यावर एटीएम मधून पैसे काढण्यासाठी शुल्क अदा करावे लागते. अन्य बँकांच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी सुध्दा ग्राहकांना खिसा रिकामा करावा लागतो. बँकांना एटीएम शुल्क वाढविण्यास आरबीआयने मुभा दिली आहे. त्यानुसार बँकांनी नववर्षापासून हे शुल्कवाढीचा निर्णय घेतला आहे.
बँकांना एटीएमवरील (ATM Cash Withdrawal) एका व्यवहारावर कमाल 21 रुपये इतके शुल्क आकारता येते. हे शुल्क आता वाढणार आहे. पण याचा ग्राहकांना भुर्दंड बसणार आहे.
हे ही वाचा :