पुढारी ऑनलाइन डेस्क : Atiq Ashraf Murder : युपीतील माफिया अतीकची बायको शाइस्ता परवीन ही देखील एक लेडी डॉन आहे. उमेश पाल हत्याकांडमध्ये नाव पुढे आल्यानंतर ती फरार आहे. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तिच्या बाबत नुकतेच नवीन खुलासे करण्यात आले आहे. लेडी डॉन शाइस्ता ही रिअल इस्टेटची मोठी व्यावसायिक आहे. अतीकला तुरुंगात टाकल्यानंतर तिनेच सर्व व्यवसाय सांभाळला आहे.
एसटीएफला (स्पेशल टास्क फोर्स) नुकतेच लेडी डॉन शाइस्ताच्या या व्यवसायाबद्दल नवीन माहिती सापडली आहे. प्रयागराजपासून ते हरियाणातील गुरुग्राम पर्यंत हा व्यवसाय पसरलेला आहे. एसटीएफ लवकरच या सर्व कंपन्यांना सील करणार आहे.
माफिया अतिकने काळ्या पैशांच्या जोरावर पूर्वांचलमध्ये डझनभर सावकारांना उभे केले होते. अतिक तुरुंगात गेल्यापासून शाईस्ता सर्व कारभार पाहत होती. भागीदार कंपन्यांच्या बिझनेस पार्टनर्सकडून हिशेब घेण्यापासून बिझनेसमध्ये गुंतवणूक करणे आणि नवीन प्रोजेक्ट्स सुरू करण्यापर्यंतची कामेही ती करते.
एसटीएफच्या तपासात शाइस्ताच्या नावावर नोंदणीकृत अशा अनेक रिअल इस्टेट कंपन्यांची माहिती समोर आली आहे, ज्या हरियाणाच्या गुरुग्राममधून चालवल्या जात आहेत. अतिकच्या नावाने गुरुग्राममधून फना असोसिएटेड प्रायव्हेट लिमिटेड चालवली जात असल्याची माहिती एसटीएफला मिळाली आहे.
गुरुग्राममधून चालवली जाणारी मेसर्स जाफरी इस्टेट लिमिटेड ही कंपनी शाइस्ताच्या मालकीची आहे. या कंपनीचा मोठा रिअल इस्टेट व्यवसाय आहे. STF ने गुरुग्राममधूनच शाइस्ताचे भाऊ फारुक आणि झाकी यांच्या नावाने MJ Infra Land LLP, MJ Infra Green Pvt Ltd, MJ Infra Houseing आणि MJ Infra State Houseing Pvt Ltd या चार कंपन्यांच्या ऑपरेशनची माहिती गोळा केली आहे.
दामूपूरमधील 300 हेक्टरमध्ये पसरलेल्या बिरामपूर, प्रयागराज, बक्षी मोधा आणि अहमद सिटीमध्ये 700 हेक्टरमध्ये पसरलेल्या अलिना सिटी फेज-1 आणि फेज-2 हे देखील अतिक-शाइस्ताचे प्रमुख निवासी प्रकल्प म्हणून ओळखले गेले आहेत.
सैदपूर बक्षी गावातील असद सिटी, सैदपूर हाऊसिंग स्कीम, सैदपूर हाउसिंग स्कीम करेहडा, लखनपूर हाउसिंग स्कीम आणि साई विहार हाउसिंग स्कीम रावतपूर को हे देखील अतिकच्या मालकीचे प्रकल्प आहेत. एसटीएफ त्यांना ताब्यात घेण्याची तयारी करत आहे.
अतीकचा कट्टर शत्रू चांद बाबा याची रोशन बाग येथे हत्या केल्यानंतर त्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. हे कॉम्प्लेक्स बनवणाऱ्या बिल्डरला एसटीएफने ताब्यात घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा नकाशाही पीडीएकडे उपलब्ध आहे. तेही जप्त करण्याची तयारी सुरू आहे.
हे ही वाचा :