मुंबई: पुढारी वृत्तसेवा : तब्बल ३५० कोटी रुपयांचा कर चुकवल्याच्या आरोपांवरुन प्राप्तीकर खात्याने (आयटी) शहा पेपर्स कंपनीच्या मुंबई आणि गुजरातमधील मालमत्तांवर छापेमारी केली. या छापेमारीत आतापर्यंत २ कोटी रुपये रोख रक्कम आणि २ कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई आणखी किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहा पेपर्स कंपनी ही अनेक मोठमोठ्या कंपन्यांची पुरवठादार कंपनी आहे. कंपनीवर खोट्या नोंदी दाखवून ३५० कोटी रुपयांचा कर चुकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्राप्तीकर खात्याकडून तपास करण्यात येत असून प्राप्तीकर खात्याच्या वेगवेगळ्या पथकांनी कंपनीशी संबंधित १८ ठिकाणी छापेमारी केली आहे. मुंबईसह गुजरातमधल्या वापी येथे ही छापेमारी सुरू आहे.
हेही वाचा