एनआयए  
Latest

NIA ची कारवाई; अल-उमर मुजाहिदीन संघटनेचा प्रमुख दहशतवादी जरगरची मालमत्ता जप्त

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: अल-उमर मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा प्रमुख जरगर याच्यावर एनआयए (NIA)कडून आज कारवाई करण्यात आली आहे. एनआयएने त्याच्या श्रीनगर येथील मालमत्तेवर छापा टाकत, ती जप्त केली आहे. पाकमधून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या मोठ्या कारवाईत सहभाग असल्याने 15 मे 1992 रोजी श्रीनगर शहरातून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी जरगर या दहशतवाद्याला अटक केली होती.

कंदाहार येथे अपहरण केलेल्या इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइटच्या बदल्यात तत्कालीन भाजप सरकारने 1999 मध्ये जेईएम प्रमुख मसूद अझहर आणि अल-उमर मुजाहिदीनचा संस्थापक-मुख्य कमांडर मुश्ताक जरगर या दहशतवाद्यांना सोडले होते. त्यानंतर त्याची श्रीनगर येथील मालमत्ता जप्त करत NIA ने ही कारवाई केली आहे.

UAPA च्या चौथ्या अनुसूची अंतर्गत भारत सरकारने दहशतवादी म्हणून घोषित केलेला जरगर सध्या पाकिस्तानात आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष तपास युनिटने (SIU) दहशतवाद्यांना जाणून बुजून आश्रय दिल्याच्या आरोपाखाली श्रीनगरमधील ४ घरे जप्त केल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई केली आहे. यापूर्वी, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, जैशचा वॉन्टेड दहशतवादी आशिक अहमद नेंगरू याचे घर अधिकाऱ्यांनी पाडले होते. अतिक्रमण झालेल्या सरकारी जमिनीवर हे घर बांधण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT